बांगलादेशमध्ये BNP ची सत्ता येणार, भारतासाठी गुडन्यूज; पंतप्रधान होणारे तारिक रेहमान कोण?
Bangladesh Election Results 2026: बांगलादेशमध्ये निवडणुका (Bangladesh Election Results 2026) पार पडल्या. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीची सत्ता येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. 300 पैकी 200 हून अधिक जागी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासाठी ही गुडन्यूज असल्याचं बोललं जात आहे. तर भारतद्वेषी जमात-ए-इस्लामीला फक्त 72 जागा मिळू शकतात.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत आणणं. भारताशी संबंध सुधारणे हा बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचा अजेंडा आहे. तर तारिक रेहमान (Tariq Rehman) बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे प्रमुख आहेत. तसेच बांगलादेशचे आगामी पंतप्रधान म्हणून तारिक रेहमान होण्याची शक्यता आहे. 17 वर्षांनंतर देशात परतल्यानंतर तारिक रहमान यांनी दोन्ही जागा (ढाका-17 आणि बोगुरा-6) जिंकल्या आहेत. 2024 मध्ये शेख हसीनाचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. यामुळे लंडनचे राहणारे तारिक रहमान पंतप्रधान होण्याच्या जवळ आले आहेत. (Bangladesh Election Results 2026)
बांगलादेश निवडणूक: BNP 212 जागांसह आघाडीवर, सरकार स्थापन करण्यासाठी अर्धा टप्पा ओलांडला
वाचा @ANI कथा |https://t.co/MzvkI0MYi4#बांगलादेश #निवडणुका #tariquerahman pic.twitter.com/Y8xsetDgyJ
— ANI डिजिटल (@ani_digital) १३ फेब्रुवारी २०२६
बांगलादेशमधील 300 जागांसाठी मतदान- (Bangladesh Election Results 2026)
बांगलादेश निवडणुकीसाठी मतदान 12 फेब्रुवारीला सकाळी 7.30 वाजता सुरू झाले आणि नऊ तासांपर्यंत सुरू राहिले. मतदारांनी दोन स्वतंत्र मतपत्रिका वापरल्या, एक संसदीय निवडणुकीसाठी आणि दुसरी जनमत चाचणीसाठी. बांगलादेशमधील 300 संसदीय मतदारसंघांपैकी 299 मतदारसंघांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. उमेदवाराच्या मृत्यूमुळे शेरपूर-3 संसदीय मतदारसंघात मतदान पुढे ढकलण्यात आले.
कोण आहेत तारिक रेहमान? (Who is Tariq Rehman?)
- बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे प्रमुख
- वडील जिया उर रहमान माजी राष्ट्राध्यक्ष होते
- आई खालिदा झिया माजी पंतप्रधान होत्या
- 17 वर्षांपासून लंडनमध्ये होते, निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात परतले
- शेख हसीनांचं सरकार असताना 84 खटले दाखल
- शेख हसीनांचं सरकार जाताच सर्व 84 खटल्यातून निर्दोष
- आईच्या निधनापासून रेहमान बीएनपी पक्षाच्या प्रमुखपदी
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.