Bangladesh Election Result – BNPची घोडदौड बहुमताकडे, तारिक रेहमान पंतप्रधान होण्याच्या तयारीत
बांगलादेशमध्ये गुरुवारी देशभरात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. सध्या या बांगलादेशमध्ये मतमोजणी सुरू असून देशाच्या जनतेने BNP ला स्पष्ट बहुमत दिल्याचे समोर आले आहे. BNP सध्या 299 पैकी 200 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे तब्बल 17 वर्षानंतर बांगलादेशमध्ये परतलेले तारिक रेहमान नवे पंतप्रधान बनण्याच्या तयारी आहेत.
बांगलादेशमध्ये ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांच्या सरकारविरुद्ध बंड पुकारण्यात आले होते. त्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशातून पळ काढला आणि हिंदुस्थानात आश्रय घेतला आहे. 18 महिन्यांपासून बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार सुरू आहे.
Comments are closed.