तणावानंतर आयसीसीचे मिशन ‘डॅमेज कंट्रोल’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी 20 वर्ल्ड कपपूर्वी हिंदुस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात निर्माण झालेल्या तणावानंतर आता आयसीसीने कूटनीतीचा डाव टाकला आहे. 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यादरम्यान आशियातील पाच प्रमुख क्रिकेट देशांच्या प्रमुखांना एकत्र बसवून संवाद साधण्याची योजना आखण्यात आली आहे. तणाव कमी करणे आणि क्रिकेटच्या माध्यमातून नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न  हेच उद्दिष्ट आयसीसीचे आहे.

बांगलादेशने आपल्या लढती श्रीलंकेत स्थलांतरित करण्याची मागणी केली होती, पण आयसीसीने फेटाळल्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशवर अन्याय झाल्याची बोंबाबोंब सुरू केली. आधी स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी, मग हिंदुस्थानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातला. त्यानंतर बांगलादेशने या प्रकरणात उडी घेत हिंदुस्थानविरुद्धचा सामना रद्द झाला तर त्याचा फटका संपूर्ण क्रिकेटविश्वाला बसेल, असा पीसीबीला इशारा दिला आणि बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीनंतर अनेक मित्रदेशांनीही पाकिस्तानला सल्ला दिला आणि मग पाकिस्तान सरकारने बहिष्काराचा निर्णय मागे घेतला.

Comments are closed.