परभणीत भाजपचे 12 नगरसेवक मुसलमान; अभ्यास करा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला! संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना सुनावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सय्यद इक्बाल यांची परभणीच्या महापौरपदी वर्णी लागली आहे. त्यावरून शिवसेनेने मुसलमान नगसेवक दिला अशी बोंब ठोकणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलेच सुनावले आहे. ”परभणीत भाजपचे 12 मुसलमान आहेत. जरा अभ्यास करा मग बोला. उचलली जीभ लावली दाढीला. तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला”, अशा शब्दात संजय राऊत यांनी मिंधे गटाला धारेवर धरले.

”एकनाथ शिंदेंना सांगा जरा अभ्यास करा. परभणीत भाजपचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत. हे त्यांना माहित आहे का? की उचलली जीभ लावली दाढीला. महाराष्ट्रात मराठी भाषिक मुस्लीम आहेत ते घुसखोर नाहीत ना. परभणीतला महापौर हा वर्षानुवर्ष शिवसेनचा निष्ठावान पदाधिकारी आहे. तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला. या देशाचे सरन्यायधीश मुस्लीम होतात, तुमचे राज्यपाल मुस्लीम आहेत, राष्ट्रपती मुस्लीम झालेले आहेत. काय माहित आहे एकनाथ शिंदेंना. अक्षरशत्रू आहेत ते. भाजपला परभणीत संधी मिळाली असती तर त्यांच्या जिंकलेल्या 12 मुस्लीम नगरसेवकांपैकी एक मुस्लीम नगरसेवक झाला असता. अमेरिका सांगतेय की आमच्या सांगण्यामुळे नोटाबंदीसारखा प्रकार झाला. जे हिंदू मुस्लीम करतायत ना त्यांनी ते वाचावं. एकनाथ शिंदेंनी एपस्टीन फाईलची 30 लाख पानं वाचावी. तुमची कुणी लोकं नाहीत ना ते बघावं? असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.