ऐन युद्धात सेनापतीच धारातीर्थी; टी-20 विश्वचषकात संघाला मोठा धक्का, रोहित शर्मापेक्षा जास्त साम
आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग बाद झाला: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आयर्लंडला मोठा फटका बसला आहे. कर्णधार पॉल स्टर्लिंग गुडघ्याच्या लिगामेंट दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झेल घेताना त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. स्कॅनमध्ये लिगामेंट डॅमेज स्पष्ट झाल्यानंतर त्याला पुनर्वसनासाठी मायदेशी परतावे लागणार आहे. आयर्लंडच्या हाय परफॉर्मन्स डायरेक्टर ग्रेम वेस्ट यांनी सांगितले की, स्टर्लिंगसारख्या अनुभवी खेळाडूची उणीव संघासाठी मोठा तोटा आहे.
रोहित शर्मापेक्षा खेळला जास्त टी-20 सामने…
टी-20 इंटरनॅशनलमध्ये आयर्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार पॉल स्टर्लिंग हा सर्वाधिक सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला. रोहितने भारताकडून 159 टी20 सामने खेळले होते. मात्र 29 जानेवारी 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातविरुद्ध मैदानात उतरताच स्टर्लिंगने 160 वा सामना खेळत हा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला.
स्टर्लिंगच्या जागी सॅम टॉपिंगला संधी…
स्टर्लिंगच्या जागी युवा डावखुरा सलामीवीर सॅम टॉपिंग याचा संघात समावेश करण्यात आला आहे. इव्हेंट टेक्निकल कमिटीने या बदलाला मान्यता दिली आहे. टॉपिंगने मागील वर्षी आयर्लंड-ए संघाकडून अफगाणिस्तान-ए विरुद्ध अबू धाबी येथे चार दिवसीय सामना खेळला होता. संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून वरच्या फळीत तात्काळ योगदानाची अपेक्षा आहे. आयर्लंडचा पुढील सामना कोलंबो येथे ओमानविरुद्ध होणार असून, आधीच दुखापतींचा सामना करणाऱ्या संघासाठी टॉपिंगची भूमिका निर्णायक ठरू शकते.
आयर्लंडला मोठा धक्का #T20WorldCup दुखापतीमुळे त्यांच्या कर्णधाराला बदलण्यास भाग पाडले 😲
तपशील 👇https://t.co/e7XP4HEtj7
— ICC (@ICC) १३ फेब्रुवारी २०२६
आयर्लंडचा अपडेट संघ – मार्क अडायर, रॉस अडायर, बेन कैलिट्ज, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रीज, जोश लिटिल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, लॉर्कन टकर, सॅम टॉपिंग, बेन व्हाईट आणि क्रेग यंग.
झिम्बाब्वेलाही धक्का!
दरम्यान, झिम्बाब्वेलाही दुखापतीमुळे बदल करावा लागला आहे. अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार ब्रेंडन टेलर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 40 वर्षीय टेलरच्या जागी बेन करनचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. सध्या संघाची धुरा सिकंदर रझा सांभाळत आहेत.
झिम्बाब्वेचा अपडेट संघ – सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रीम क्रेमर, बेन करन, ब्रॅडली इव्हान्स, क्लाईव्ह मडांडे, टिनोटेंडा मापोसा, तदिवानाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्झा, टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजारबानी, डियोन मायर्स आणि रिचर्ड नगारवा.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.