अनाया बांगर पून्हा नवीन सर्जरी करणार, शरीरात होणार मुख्य बदल, VIDEO शेअर करून सर्वच सांगितलं
अनाया बांगरने व्हिडिओवरून लिंग पुनर्असाइनमेंट सर्जरीची घोषणा केली: माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आयर्न बांगर आता अनाया बांगर म्हणून ओळखला जातो. अनाया बांगर सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. तिनं अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिनं तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. तिनं व्हिडिओतून 14 मार्च रोजी बँकॉकमध्ये जेंडर रिसाइनमेंट सर्जरीला जाणार असल्याचं सांगितलं. तिनं या व्हिडिओतून याची माहिती दिली. तिनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिचा हा निर्णय स्पष्ट केला.
“या सर्जरीचा नक्कीच फायदा होईल. या सर्जरीमुळे माझ्यासारख्या ट्रान्समहिलांना आरामदायी वाटण्यास मदत होते”. असं अनायाने व्हिडिओतून घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती दिली. ‘हे अचानक किंवा भावनिक घेतलेले पाऊल नाही. तर, अनेक वर्षांच्या सुनियोजित आणि वैद्यकीयदृष्ट्या मार्गदर्शन प्रक्रियेतून घेतलेला निर्णय आहे’, असंही व्हिडिओतून तिनं स्पष्ट केलं.
अनाया मनोवैज्ञानिक मूल्यांकन, नियमित थेरेपी, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी, विस्तृत मेडिकल असेसमेंट पूर्ण करून या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. दोन पूर्व जेंडर अफर्मिंग प्रक्रियांमुळे तिला सर्जरीसाठी तयार केले गेले आहे. हा निर्णय कायदेशीर चौकटीत आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली घेतला गेला आहे, असं अनायाने सांगितलं.
अनायाने स्पष्ट केले की, तिची शस्त्रक्रिया बँकॉकमधील प्रसिद्ध सर्जन डॉ. चेट्टावुत यांच्याकडून केली जाईल. जी स्किन ग्राफ्ट योनीप्लास्टी प्रक्रिया असेल. या सर्जरीनंतर लवकर रिकव्हरी होत नाही. रिकव्हरीसाठी वेळ लागतो. अनायाला पूर्णपणे बरी होण्यासाठी एक वर्ष लागू शकतो, असा अंदाज आहे. या प्रवासात अनायाला कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळला आहे. अनाया म्हणाली, “या प्रवासात कुटुंबाचा, विशेषत: वडिलांचा भावनिक आणि आर्थिक पाठिंबा मिळाला आहे. वडिलांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे”, असं अनाया म्हणाली.
सर्जरीबाबत अनाया म्हणाली, “हे पाऊल काहीही सिद्ध करण्यासाठी नाही. तर, आतील आपली ओळख बाहेर काढण्यासाठी आहे. जेणेकरून शेवटी माझ्या शरीराला आरामदायी वाटेल”, असं तिनं व्हिडिओतून स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.