Raindrop Bangles: ट्रेंडिंग रेनड्रॉप बांगड्या; पारंपरिक आणि इंडो वेस्टर्न लूकसाठी परिपूर्ण

आजकाल रेनड्रॉप बांगड्यांचे विविध डिझाइन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वेगवेगळे रंग आणि डिझाइन्समुळे या बांगड्यांना महिला आणि तरुणींची विशेष पसंती मिळत आहे. अगदी छोट्या कार्यक्रमापासून ते लग्न समारंभात तुम्ही या बांगड्या घालू शकता. कोणत्याही आऊटफिटवर या बांगड्या शोभून दिसतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही या बांगड्या खरेदी करू शकता. ( Trending Raindrop Bangles Collection )

क्रिस्टल डिझाइन

यामध्ये बांगड्यावर लहान वेगवेगळ्या रंगांचे क्रिस्टल्स एम्बेड केलेले असतात. हे क्रिस्टल्स थेंबाप्रमाणे अगदी छोट्या आकाराचे असतात. प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर ते चमकतात. जर तुम्हाला बहुरंगी बांगड्या आवडत असतील तर ही डिझाइन पारंपरिक आणि इंडो-वेस्टर्न दोन्ही आऊटफिटवर छान दिसते.

लटकन डिझाइन

लटकन डिझाईनच्या रेनड्रॉप बांगड्या आजकाल सर्वात ट्रेंडी आहेत. त्यात लहान मोती किंवा घुंगरू असतात. लग्न समारंभात हेव्ही लूक परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या हातात घालू शकता.

पेस्टल शेड्स डिझाईन

आजकाल पेस्टल शेड्स आऊटफिट जास्त ट्रेंडिंग आहेत. अशावेळी तुम्ही त्यावर पेस्टल शेड्स रेनड्रॉप बांगड्या घालू शकता. हे एक अतिशय सुंदर आणि शाही डिझाईन आहे. ऑफिस पार्टी किंवा दिवसाच्या कार्यक्रमांसाठी हे उत्तम ठरते.

ट्रान्सपेरंट डिझाईन

हे डिझाईन मेटल किंवा काचेच्या बांगड्यांसोबत घातल्यास जास्त शोभून दिसते. तरुणी आणि नववधूंमध्ये हे डिझाईन लोकप्रिय आहे. हातात घातल्यावर या बांगड्या अतिशय सुंदर दिसतात.

ड्युअल शेडेड डिझाईन

ड्युअल शेडेड रेनड्रॉप बांगड्या आजकाल महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. दोन रंगांचे सुंदर कॉम्बिनेशन हे त्याला खास बनवते. ही बांगडी मॉडर्न आणि पारंपारिक दोन्ही आऊटफिटवर परिपूर्ण दिसते.

हेही वाचा: Chidamoti Choker : पारंपरिक दागिन्यांचा रॉयल कमबॅक; चिडामोती चोकर पुन्हा ट्रेंडमध्ये

Comments are closed.