अमेरिकेतील साउथ कॅरोलिना विद्यापीठात गोळीबार, दोन जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठ प्रशासनाने कॅम्पसमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी विद्यापीठाच्या ‘ह्युगीन सूट्स’ (Hugine Suites) या निवासी संकुलात गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने तत्काळ विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आणि कॅम्पस सील केला आहे.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास साऊथ कॅरोलिना लॉ एन्फोर्समेंट डिव्हिजनकडे (SLED) सोपवण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.

Comments are closed.