मुंबईच्या पोराची कमाल! टी-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेचा मोठा विजय; नेदरलँड्सचा 93 धावांनी धुव्वा

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात युएसए (USA) संघाने नेदरलँड्सचा 93 धावांनी मोठा पराभव केला आहे. अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या होत्या, जो त्यांच्या टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील दुसरा सर्वात मोठा स्कोअर ठरला. 197 धावांच्या या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ पूर्ण 20 षटकेही टिकू शकला नाही आणि अवघ्या 103 धावांत गारद झाला.
मुंबईत जन्मलेल्या हरमीत सिंगने आपल्या घातक गोलंदाजीने नेदरलँड्सच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने 4 षटकांत केवळ 21 धावा देऊन 4 महत्त्वाचे बळी घेतले. हरमीतने यापूर्वी भारताच्या देशांर्गत क्रिकेटमध्ये मुंबई आणि त्रिपुरा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला.
अमेरिकेचा दुसरा गोलंदाज शेडली वैन शाल्कविक यानेही आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली. त्याने या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, या स्पर्धेत त्याने आतापर्यंत एकूण 11 विकेट्स घेतल्या असून तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
Comments are closed.