दिल्लीतील तीन शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील 3 शाळांना शुक्रवारी बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे ईमेल मिळाले आहेत. या धमकीनंतर पोलिसांनी शाळा परिसरांमध्ये तपासणी केली आहे. या तपासणीत कुठल्याही शाळेत काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
मध्य दिल्लीच्या झंडेवालान भागातील बीटी तमिळ शाळेलाही बॉम्बची धमकी मिळाली होती. या शाळेने सकाळी 9.12 वाजण्याच्या सुमारास या धमकीची माहिती प्रशासनाला कळविली होती. तर आणखी एका शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेज पाठवून याची माहिती दिली होती. या धमकीनंतर पोलिसांकडून सर्व शाळा रिकामी करविण्यात आल्या होत्या. यानंतर केलेल्या तपासणीत काहीच संशयास्पद न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर धमकीचा ईमेल पाठविणाऱ्यांचा शोध आता तपास यंत्रणांकडून घेतला जाणार आहे.
Comments are closed.