शाब्दिक लढाई संपली, आता भारत-पाकिस्तान खरेखुरे एकमेकांना भिडणार, सामना कधी, कुठे, कसा पाहाल; फु

भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक लाइव्ह स्ट्रीमिंग: वादळ शांत झालंय… तणाव निवळलाय… आणि प्रतीक्षेच्या क्षणांचं काउंटडाउन आता संपत आलंय. ज्या सामन्याभोवती प्रचंड गदारोळ झाला, ज्याच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं, ती महासंग्रामाची वेळ अखेर दारात येऊन ठेपली आहे. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांची बहुप्रतीक्षित लढत रंगणार आहे. रविवार 15 फेब्रुवारी रोजी ग्रुप स्टेजमधील या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा तिसराच सामना असणार असून, जो संघ जिंकेल तो थेट पुढील फेरीत प्रवेश मिळवेल. त्यामुळे हा सामना म्हणजे जणू ‘करो या मरो’ अशीच स्थिती आहे.

काही दिवसांपूर्वी मात्र या सामन्यावर संकटाचं सावट दाटलं होतं. बांगलादेशच्या स्पर्धेबाहेर पडल्यावर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. त्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. जवळपास आठवडाभर चर्चा, बैठक आणि तोडग्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर हा तिढा सुटला आणि पाकिस्तानने बहिष्कार मागे घेतला. आता पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना एकाच मैदानावर भिडताना पाहण्याची सुवर्णसंधी चाहत्यांना मिळणार आहे.

सामना नेमका किती वाजता सुरू होणार? तो कोणत्या मैदानावर खेळला जाणार? आणि थेट प्रक्षेपण कुठे पाहता येणार? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती….

भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक सामना कधी आणि कुठे पहायचा?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी होईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा गट अ सामना रविवार, 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी खेळला जाईल.

नाणेफेक किती वाजता होईल आणि सामना कधी सुरू होईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा टॉस संध्याकाळी 6:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) होईल, सामना अर्ध्या तासाने संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे खेळला जाईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळला जाईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर थेट कसा पहावा?

भारतात, हा सामना विविध स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी आणि स्टार स्पोर्ट्स 2 सारख्या चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ऑनलाइन कुठे प्रसारित केला जाईल?

2026 च्या टी-20 विश्वचषकातील सर्व सामन्यांप्रमाणे, भारत-पाकिस्तान सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग देखील डिस्ने+ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर असेल.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ : सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.

हे ही वाचा –

Hardik Pandya News : BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला ‘कात्रजचा घाट’, गर्लफ्रेंडसोबतचा ‘तो’ Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ

Comments are closed.