BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन्

हार्दिक पांड्या-महिका शर्माचा व्हायरल व्हिडिओ : टी-20 वर्ल्ड कप 2026मध्ये भारताचा पुढील मोठा सामना पाकिस्तानविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी भारतीय संघ आधीच कोलंबोला दाखल झाला आहे. संघाच्या आगमनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यावरून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमुळे भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे.

हार्दिक–माहिका व्हिडिओवरून खळबळ

व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे, इतर खेळाडू एकटेच म्हणजे कुटुंबीय किंवा पार्टनरशिवाय कोलंबोला पोहोचलेले दिसतात. त्यामुळे हार्दिकसोबत माहिकाची उपस्थिती चाहत्यांसाठी आश्चर्याचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की, हार्दिकने बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केले का?

बीसीसीआयची भूमिका काय?

अलीकडील काही वृत्तांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने टी-20 वर्ल्ड कपदरम्यान खेळाडूंना पत्नी, मंगेतर किंवा कुटुंबीयांना अधिकृत संघासोबत ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. भारतीय टीम मॅनेजमेंटने यासाठी परवानगी मागितली होती. मात्र बोर्डाने तो प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हार्दिक आणि माहिका यांचा संघासोबत कोलंबोला प्रवास झाल्याची चर्चा रंगली आहे.

नेमकी पॉलिसी काय सांगते?

बीसीसीआयच्या विद्यमान धोरणानुसार, 45 दिवसांपेक्षा अधिक कालावधीच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंना कुटुंबीयांना जास्तीत जास्त 14 दिवसांपर्यंतच सोबत ठेवण्याची परवानगी असते. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही हेच नियम लागू होतात. खेळाडूंना इच्छेनुसार कुटुंबासाठी स्वतंत्र हॉटेल किंवा व्यवस्था करता येते. मात्र संघाच्या अधिकृत निवासस्थानी किंवा अधिकृत प्रवासात त्यांचा समावेश करता येत नाही. या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांचा व्हिडिओ समोर आल्याने शिस्त आणि नियमांविषयी नवी चर्चा सुरू झाली आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण येणे बाकी आहे.

हे ही वाचा –

IND vs PAK Weather Report : हायव्होल्टेज ड्रामा, पाऊस ठरतोय व्हिलन; सामना रद्द झाला तर पाकिस्तानची चांदी, टीम इंडिया OUT?, पाहा पॉइंट्स टेबलचं गणित

आणखी वाचा

Comments are closed.