भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेज! जाहिराती, विमान तिकीटे-हॉटेल बुकिंगचे दर भीडले गगनाला

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून त्याची क्रेज जबरदस्त दिसून येत आहे. या सामन्यादरम्यान व्ह्यूअरशीपचा फायदा घेण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ दिसत आहे.
इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या मते, १० सेंकदाचा टीव्ही ऍड स्लॉटचा दर ३०-४० लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये हा दर २०-२५ लाख रुपये असतो. शेवटच्या वेळेच्या ऍड स्लॉट्सच्या दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रत्येक सेंकदातून लाखो रुपयांची कमाई होणार असल्याने ब्रॉडकास्टर जिओस्टारला या स्पर्धेतून २००० कोटी रुपयांची कमाई केवळ जाहिरातींमधून होणार आहे.
डिजिटल स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारच्या जाहिरातींच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली आहे. या स्पर्धेसाठी जाहिराती देणाऱ्या कंपन्यांमध्ये एमिरेट्स, अमूल, महिंद्रा एंड महिंद्रा, ओपन एआय, ब्रिटानिया आणि Hyundai यांचा समावेश आहे. मार्केटिंग एक्सपर्ट्सच्या मते भारत-पाकिस्तान सामन्यावेळी ऍड्च्या दराची तुलना सोने-चांदीच्या किंमतीमध्ये केली जात आहे.
विमानच्या तिकीटांचा दर पाहिला तर Cleartripच्या अनुसार, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी कोलंबोच्या तिकीटांमध्ये ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक भारतीय चाहत्यांचा समावेश आहे. काही बुकिंगच्या ठिकाणी १४ आणि १५ फेब्रुवारीसाठी १.४५ लाख रुपये तिकीटाचे दर झाले आहेत, जे सामन्यावेळी ३०,००० रुपयांपर्यंत असतात. एयर इंडियाचे दर ९०,००० वरून एक लाख रुपये झाला आहे. श्रीलंकेच्या एयरलाइंसचे तिकीटे ६५,००० ते १,४५ लाख रुपयांमध्ये आहे.
हॉटेलच्या दरांमध्ये फरक दिसला. त्या शहरातील हॉटेलचे बुकींगही २० ते २५ टक्क्यांनी महाग झाले आहेत. एव्हाना त्यांचे दर ४०, ००० रुपये असतात, मात्र या मोठ्या सामन्यामुळे तो दर १.१ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत जवळपास सर्व हॉटेल आणि विमानाची तिकीटे बूक झालेली आहेत.
Comments are closed.