13 षटकार, 21 चौकार आणि 235 धावा! टी20 विश्वचषकात आयर्लंडने रचला इतिहास, स्पर्धेतील सर्वोच्च…

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (१४ फेब्रुवारी) पहिला सामना आयर्लंड विरुद्ध ओमान यांच्यात खेळला जात आहे. कोलंबोमध्ये सुरू असलेल्या या सामन्यामध्ये ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगने नाणेफेक जिंकत आयर्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. आयर्लंडनेही २० षटकात ५ विकेट्स गमावत २३५ धावसंख्या उभारली. ही आयर्लंडची टी२० विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. त्याचबरोबर या हंगामातीलही ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. याबाबतीत त्यांनी श्रीलंकेला मागे टाकले. श्रीलंकेने १२ फेब्रुवारीला ओमानविरुद्धच २२५ धावसंख्या उभारली होती.
याचबरोबर आयर्लंड टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या करणारा दुसरा संघ ठरला आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या श्रीलंकेने केली. त्यांनी २००७मध्ये जोहान्सबर्ग येथे केनियाविरुद्ध २० षटकात ६ विकेट्स गमावत २६० धावा केल्या होत्या. त्या विक्रमाच्याजवळ जाण्याचा प्रयत्न २०१६मध्ये इंग्लंडने केला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यात ते केवळ २३० धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकले.
आयर्लंडने या सामन्यात तब्बल १३ षटकार आणि २१ चौकार मारले. त्यामध्ये कर्णधार विकेटकीपर लोर्कन टकरची नाबाद ९४ धावांची खेळी उल्लेखनीय ठरली. त्याने ५१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकार मारले.
तसेच गॅरेथ डेलानी यानेही ३० चेंडीत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ५६ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये ९ चेंडूत ३५ धावा केल्या आणि आयर्लंडने विक्रमी धावसंख्या केली.त्याने शेवटच्या षटकात लागोपाठ तीन षटकार मारले.
Comments are closed.