T20 WC26: वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या आशा जिवंत, स्कॉटलंडला 5 विकेट्सने केले पराभूत

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (शनिवार ,१४ फेब्रुवारी) दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंड ५ विकेट्सने जिंकला आहे. हा सामना जिंकणे इंग्लंडसाठी महत्वाचे होते. त्यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली.
या स्पर्धेत मागील काही सामन्यांमध्ये अनेक लहान संघांनी बलाढ्या आणि विश्वविजेत्या संघांना चांगलीच टक्कर दिली आहे. कालच्याच (शुक्रवार, १३ फेब्रुवारी) सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत धक्का दिला. नेपाळनेही इंग्लंडला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. यामुळे या सामन्यात काय निकाल लागणार याची
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात स्कॉटलंडने १९.४ षटकात १० विकेट्स गमावत १५२ धावा केल्या. स्कॉटलंडच्या फलंदाजीची सुरूवात संथ झाली. त्यांनी पहिलीच विकेट १८ धावांवर गमावली. मायकल जोन्सही ३३ धावा करत बाद झाला. त्यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टनने टॉम ब्रूसच्या साथीने डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र एकही मोठी भागीदारी झाली नाही. बेरिंग्टन सर्वाधिक अशा ४९ धावा करत बाद झाला. त्याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. ब्रूसने २४ धावा आणि ऑलिव्हर डेविडसनने २० धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त कोणीही दुहेरी धावा करू शकला नाही. इंग्लंडकडून सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामध्ये जोफ्रा आर्चरची प्रभावी गोलंदाजी ठरली. त्याने ४ षटकात २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात अडखळत झाली. त्यांनी पॉवरप्लेमध्येच दोन विकेट्स गमावल्या. फिल सॉल्ट आणि जोस बटलर एकेरी धावांवरच बाद झाले. त्यानंतर मात्र जेकब बेथेल आणि टॉम बॅंटनने संघाचा विजय केला. जेकब ३२ धावा करत बाद झाला.
बातमी अपडेट होते आहे…
Comments are closed.