Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहेत अशा शब्दात धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कार्यक्रमात आपल्या भावना मांडल्या. त्यांना आपल्या मनातील इच्छा माहीत असल्याने जास्त बोलू नको असा निरोप मुख्यमंत्र्यांनी दिल्याची पुष्टीही धनंजय मुंडेंनी जोडली. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या डोक्यात टपली मारली. त्यामुळे मुंडेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. परळीतील महापशुधन एक्सपोच्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी परळीत आले होते. याच व्यासपीठावर पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. त्यावेळी भाषण करत असताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख कामधेनू असा केला.
Comments are closed.