गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफल्ला
राजकारणातील एकमेकांचे पारंपरिक शत्रू एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधला वाद पुन्हा उफाळून आलाय.. गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर तोफ डागलीये..नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते. मात्र ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातायत, असा आरोपच गणेश नाईकांनी केलाय…यावेळी त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष लक्ष्य केलंय… दरम्यान नाईकांच्या टीकेला मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी उत्तर दिलंय…
गणेश नाईकांची पुन्हा एकनाथ शिंदेंवर तोफ
नगरविकास खात्यावर टीका करत धरलं एकनाथ शिंदेंना धारेवर
चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का?- नाईक
नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठीचे भूखंड बिल्डरांच्या घशात- नाईक
हॉस्पिटल, बगिचा यांसाठीचे भूखंड बिल्डरांच्या घशात- नाईक
नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम- नाईक
दरम्यान गणेश नाईक कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना जर बिल्डरांच्या घशात भूखंड घातले असतील असं वाटत असेल, तर त्यांनी योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय..
Comments are closed.