IND vs PAK: कोलंबोत ढगाळ वातावरण, पुढील 24 तासांचा हवामान रिपोर्ट समोर! भारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर ऐतिहासिक सामना होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सामन्याची जोरदार चर्चा आहे. पाकिस्तानने आधी या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती आणि नंतर आपला निर्णय मागे घेतला, ज्यामुळे या सामन्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दोन्ही संघांनी सामन्यापूर्वी सराव करून आपली तयारी पूर्ण केली असली, तरी या सामन्यावर पावसाचे मोठे संकट आहे.
पुढील 24 तासांतील कोलंबोच्या हवामानाबाबत दोन महत्त्वाचे रिपोर्ट समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, सामना सुरू होण्यापूर्वीच्या पाच तासांत पावसाची शक्यता 40 ते 48 टक्के आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल तेव्हा ही शक्यता वाढून 57 टक्क्यांपर्यंत जाईल. मात्र, त्यानंतर ती कमी होऊन 18 टक्क्यांवर येण्याची आशा आहे. तर एक्यूवेदर रिपोर्ट (AccuWeather) या रिपोर्टनुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 59 टक्के आहे. पण सुदैवाने संध्याकाळी 6 वाजेनंतर पावसाची शक्यता फक्त 9 टक्क्यांपर्यंत खाली येईल. मात्र, आकाश पूर्णपणे ढगाळ असेल.
जर पावसाने हजेरी लावली आणि तो वेळेवर थांबला, तर सामना सुरू व्हायला जास्त वेळ लागणार नाही. कारण, आर. प्रेमदासा स्टेडियमची ड्रेनेज सिस्टम (पाणी उपसण्याची यंत्रणा) अतिशय उत्तम आहे. पाऊस सुरू झाल्यावर संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकले जाते. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर मैदानात साचलेले पाणी काढून खेळ पुन्हा सुरू करणे ग्राऊंड स्टाफला सोपे जाते.
Comments are closed.