सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून छळ

उल्हासनगर क्राईम न्यूज : उल्हासनगरमध्ये सावकाराच्या गुंडागर्दीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्याजाने दिलेले पैसे वेळेत न मिळाल्याच्या कारणावरून एका सावकाराने भरदिवसा चायनीज सेंटरमध्ये घुसून 30 वर्षीय तरुणाचे अपहरण (Ulhasnagar Crime) केले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण (Crime News) करत लॉजमध्ये डांबून अर्ध नग्न अवस्थेत व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच चाकूच्या धाकावर अमानुष छळ देखील केलाहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 परिसरात घडली असून हिल लाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा (Ulhasnagar Crime News) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसारजखमी चिराग मीरचंदानी अंबरनाथ पूर्व येथील आश्रय आनंद इमारत येथे कुटुंबासह राहतात. त्यांनी आरोपी सावकार अमित चागुला याच्याकडून 4 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी 2 लाख 50 हजार रुपये त्यांनी परत केले होते. मात्र आरोपी 4 लाख 50 हजार रुपयांची मागणी करत होता. वाढत्या व्याजामुळे उर्वरित रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी कट रचला.

Ulhasnagar Crime: लॉजमध्ये कोंडून मारहाण, गुप्तांग कापण्याची धमकी, बहिणीबाबत अश्लील व अवमानकारक वक्तव्य

दरम्यान9 फेब्रुवारीच्या रात्री, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथील एका चायनीज सेंटरमध्ये जेवत असताना आरोपींनी लोखंडी पाइपने चिराग यांना मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने कारमध्ये बसवून बदलापूर येथील एका कार्यालयात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. पुढे त्यांना माथेरान येथे नेऊन एका लॉजमध्ये कोंडून ठेवण्यात आले. तेथे नग्न करून मारहाण करत व्हिडिओ तयार करण्यात आला. पैसे न दिल्यास गुप्तांग कापण्याची धमकी देण्यात आली. तसेच त्यांच्या बहिणीबाबत अश्लील व अवमानकारक वक्तव्य करत पैशांची मागणी करण्यात आली.

Ulhasnagar Crime News : 1 लाख 25 हजार रुपये जमा केल्यानंतर सुटका, गुन्हा दाखल

अखेरीस, आरोपींच्या सांगण्यावरून कैलाश नगर परिसरातील एका व्यक्तीकडे 1 लाख 25 हजार रुपये जमा केल्यानंतर चिराग यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अमित चागुला, कमल नागदेव आणि त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत व पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.