खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट; निखिल गुप्ताला 24 वर्षांचा तुरुंगवास, अमेरिकेतील न्यायालयाने ठोठावली शिक्षा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी हिंदुस्थानी नागरिक निखिल गुप्ता याला अमेरिकेतील न्यायालयाने 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. अमेरिकेची तपास संस्था ‘एफबीआय’ने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली.

एफबीआयने म्हटले की, एका अमेरिकन नागरिकाची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता तो उधळण्यात आला. निखिल गुप्ता याने त्याच्यावर लावलेले तिन्ही आरोप स्वीकारले आहेत, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. निखिल गुप्ता याला 30 जून 2023 रोजी चेक रिपब्लिक येथे स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वर्षभराने त्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात आले होते. विकास यादव या हिंदुस्थानच्या माजी अधिकाऱयाने गुप्ता याला पन्नू याची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा दावा अमेरिकेच्या तपास संस्थांनी केला होता. गुप्ताने या कामासाठी आणखी एकाला सुपारी दिली. तो अमेरिकेचा एजंट निघाला आणि निखिल गुप्ता पकडला गेला.

Comments are closed.