भारत-पाक सामन्याबाबत महत्त्वाची अपडेट, कोलंबोच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, सूर्य किंचित डोका
भारत विरुद्ध पाक T20 विश्वचषक: भारत–पाकिस्तान (Ind Vs Pak) या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. श्रीलंकेतील कोलंबो शहरात सध्या ढगाळ वातावरण असून सकाळी काही काळासाठी सूर्य डोकावला होता, मात्र त्यानंतर पुन्हा काळ्या ढगांनी आकाश व्यापले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भारत–पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट दिसून येत आहे.
Ind Vs Pak T20 World Cup: सामना कधी आणि कुठे?
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आज, रविवार 15 फेब्रुवारी रोजी आमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमान असले तरी पाकिस्तानला भारतात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे हा सामना श्रीलंकेत खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया शनिवारी पहाटे श्रीलंकेत दाखल झाली आहे.
Ind Vs Pak T20 World Cup: हवामानाचा अंदाज काय सांगतो?
हवामान खात्यानुसार, सामन्यादरम्यान पावसाची 65 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज आहे. मात्र, संध्याकाळी 7 वाजेपर्यंतही सुमारे 50 टक्के पावसाची शक्यता कायम असल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.
Ind Vs Pak T20 World Cup: सामना रद्द झाला तर काय?
हा 20-20 षटकांचा सामना असल्याने निकालासाठी किमान दोन्ही संघांना 5-5 षटकांचा खेळ आवश्यक आहे. जर तेवढाही खेळ झाला नाही, तर सामना रद्द ठरेल.
सामना रद्द झाल्यास:
- भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी 1-1 गुण मिळेल,
- दोन्ही संघांचे गुण 5-5 होतील,
- गुणतालिकेत फारसा मोठा फरक पडणार नाही,
Ind Vs Pak T20 World Cup: कोणाला फायदा?
दोन्ही संघ ए गटात असून त्यांनी आतापर्यंत 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत. मात्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा नेट रनरेट चांगला असल्याने टीम इंडिया सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. सामना रद्द झाला तरी दोन्ही संघांना सुपर 8 मध्ये प्रवेशासाठी शेवटचा साखळी सामना जिंकणे अनिवार्य असणार आहे.
Ind Vs Pak T20 World Cup: पुढील आव्हान कोणाचं?
साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचे आव्हान असेल,तर पाकिस्तान नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर, भारत–पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तरी दोन्ही संघांच्या पुढील वाटचालीवर फारसा परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे, या सामन्यासाठी राखीव दिवसाची कोणतीही तरतूद नाही. एकीकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडे लागले असताना आजचा सामना होणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.