FIH Pro League: भारतीय संघाची पराभवाची हॅट्ट्रीक, बेल्जियमकडून 4-2ने पराभूत

भारतीय हॉकी संघाची एफआयएच २०२५-२६ च्या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजूनही सुरूच आहे. ओडिसाच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमध्ये शनिवारी (१४ फेब्रुवारी) बेल्जियमने भारताचा ४-२ असा पराभव केला. यामध्ये भारताकडून आदित्या लालागेने २३व्या मिनिटाला आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगने ३६व्या मिनिटाला गोल केले. बेल्जियमकडून अलेक्झांडर हेंड्रिक्सने १४व्या आणि १७व्या, ह्यूगो लॅबोचेरे याने ११व्या आणि आर्थर डी स्लोवर याने १५व्या मिनिटाला गोल केले.

या लीगमधील दोन्ही संघाचा विरोधातील हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यातही बेल्जियमनेच बाजी मारली होती. तो सामना भारताने ३-१ असा गमावला. त्यानंतर अर्जेंटिनाविरुद्ध ८-० असा मोठा पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात बेल्जियमने सुरूवातच आक्रमक केली. भारताच्या हार्दिक सिंगने उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केल्या. काही वेळ बेल्जियमच्या बचावफळीने यजमान संघाला आव्हान दिले होते.

सामन्याच्या ७व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली, मात्र तो गोल अपात्र ठरवला गेला. बेल्जियमलाही ११व्या मिनिटाला गोल करण्याची संधी प्राप्त झाली. पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत त्यांनी १-० अशी आघाडी घेतली. भारताचा गोलकिपर सुरज कारकेराने प्रयत्न केले मात्र बेल्जियमने सत्राच्या शेवटच्या मिनिटाला आघाडी घेतली. त्यामुळे भारतावर दबाव वाढतच चालला, कारण १४व्या मिनिटालाच हेंड्रिक्सने गोल करत सामना २-० असा केला.

दुसऱ्या सत्राची सुरूवात बेल्जियमने गोल करत केली. १७व्या मिनिटाला हेंड्रिक्सने कोणतीही चूक न करत ड्रॅग-फ्लिककरत गोल केला. बेल्जियमने ४-० अशी भलीमोठी आघाडी घेतली. यामुळे भारताच्या प्रयत्नांमध्ये वेग आला. आदित्याने गोल करत भारताला थोडासा दिलासा दिला. तो गोल अडवण्याचा प्रयत्नात बेल्जियम गोलकिपर लॉइक व्हॅन डोरेन होता, मात्र आदित्याने त्याला हुशारीने चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. त्यामुळे सामना ४-१ असा झाला.

भारताच्या बचाव फळीने बेल्जियमला मिळालेल्या सहाव्या पेनाल्टी कॉर्नरला यशस्वीरित्या रोकले. काही वेळानंतर भारताच्या सुखजीत सिंगने पेनाल्टी कॉर्नर मिळवला, ज्याचे कर्णधार हरमनप्रीतने गोलमध्ये रुपांतर केले. यामुळे अंतर थोडे कमी झालेले दिसले.

सामन्याच्या शेवटच्या सत्रात बेल्जियम अधिक आक्रमक दिसला. ४४ व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी होती, मात्र डोरेनने उत्तम कामगिरी करत तो गोल वाचवला. भारताच्या पवननेही दोन गोल वाचवले, त्यामुळे भारताच्या जिंकण्याच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. बेल्जियमच्या बचावफळीने मात्र त्यावर पाणी फेरले.

आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना अर्जेंटिनाविरुद्ध रविवारी (१५ फेब्रुवारी) आहे.

Comments are closed.