रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये राहुल-पड्डीकलचे शतक, कसोटीत द्विशतक करणारा फलंदाज फेल

भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामाचे उपांत्य फेरीचे सामने सुरू आहेत. यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना कर्नाटक विरुद्ध उत्तराखंड असा खेळला जात आहे. लखनऊमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात उत्तराखंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २५०चा आकडा पार केला आहे. यामध्ये केएल राहुल आणि देवदत्त पड्डीकल यांनी शतकी खेळी केल्या आहेत. तर मयंक अग्रवाल ५ धावा करत बाद झाला.

राहुलचे हे प्रथम श्रेणीमधील २५वे शतक ठरले आहे. त्याने उपांत्यपूर्व सामन्यातही शतकी खेळी केली होती. त्याने उत्तराखंड विरुद्ध २११ चेडूत १४१ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याची प्रथम श्रेणीतील कामगिरी पाहिली तर त्याने ४४.९०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत कारकिर्दीत ११८ सामन्यांच्या २०६ डावांमध्ये ८७५७ धावा केल्या आहेत.

पड्डीकलने कर्णधारपद भुषवताना २२६ चेंडूत १४० धावांची खेळी केली आहे. यामध्ये त्याने १५ चौकार आणि २ षटकार मारले. तो सध्या खेळपट्टीवर उपस्थित आहे. त्याच्यासोबत करुण नायर असून तो २४ धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचे तिसरे सत्र सुरू आहे. त्यामुळे कर्नाटकचे पहिल्या डावात २ बाद ३४२ धावा झाल्या आहेत.

या स्पर्धेत कर्नाटकने उपांत्य फेरीत ४२ वेळचा रणजी ट्रॉफी विजेता संघ मुंबईला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Comments are closed.