IND vs PAK: जगासमोर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की; भारताने मैदानावर दाखवली जागा!

15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषकातील थरार रंगत आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हे दोन्ही संघ समोरासमोर आले आहेत. पाकिस्तानने नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. मात्र, नाणेफेकीदरम्यान भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
नाणेफेकीसाठी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav no handshake with captain of Pakistan) आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा मैदानात आले होते. यावेळी सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. भारताने पुन्हा एकदा जगासमोर पाकिस्तानची नाचक्की केली आहे. अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी आशिया कप 2025 मध्येही भारतीय संघाने तीन वेळा पाकिस्तानशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान हस्तांदोलन न करण्याची ही परंपरा सुरू झाली आहे. आशिया कप 2025 च्या लीग स्टेज सामन्यात भारताने पहिल्यांदा पाकिस्तानशी हात न मिळवण्याचा निर्णय घेतला होता, जो आजही कायम आहे.
Comments are closed.