यूएसएच्या गोलंदाजाची कमाल! टी20 वर्ल्डकपच्या पॉवरप्लेमध्ये पाडलायं विकेट्सचा पाऊस, कोणीही त्याच्याजवळ नाही

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत अनेक मोठी विक्रमे झाली आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात तर पहिल्यांदाच २० संघ खेळत आहेत. त्यामध्ये अनेक नवख्या संघातील खेळाडूंनी महत्वाची कामगिरी केली आहे. यूएसएच्या एका गोलंदाजाने तर भारत-पाकिस्तान सामन्यात ४-४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. आज (रविवार, १५ फेब्रवारी) यूएसए विरुद्ध नामिबिया सामना खेळला गेला. त्यामध्ये पुन्हा एकदा त्या गोलंदाजाने विशेष कामगिरी केली.

यूएसएचा वेगवान गोलंदाज वॅन शाल्कविक शेडली याने चारही ग्रुपचे सामने खेळले असून त्यामध्ये त्याने विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याबाबत एक विशेष असे की त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी निम्म्या विकेट्स त्याने सामन्याच्या सहाव्या षटकातच घेतल्या आहेत.

शेडलीने भारताविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात २५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्याने सहावे षटक टाकले असता तीन विकेट्स घेत एकच धाव दिली होती. यामध्ये त्याने ईशान किशन, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धही त्याने ४ षटकात २५धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्याच्या सहाव्या षटकात त्याने २ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यात सलमान आगा आणि सईम आयुब यांचा समावेश आहे.

नेदरलॅंड्सविरुद्ध शेडलीने २.५ षटकात २१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामधील नेदरलॅंड्सच्या सहाव्या षटकात १० धावा देत एक विकेट घेतली होती. कोलिन ऍकरमनची ती विकेट होती. नामिबियाविरुद्धही त्याने हीच कामगिरी केली. त्यांच्याविरुद्धच्या सहाव्या षटकात त्याने ९ धावा देत जॅन फ्रायलिंकची विकेट घेतली. या सामन्यातही त्याने पूर्ण ४ षटके टाकली असून ३० धावा देत २ विकेट्स घेतल्या.

शेडलीने या विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये ७ षटकात ७ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ५.८५ राहिला. त्याचबरोबर त्याने टी२० विश्वचषकाच्या इतिहासात एका असोसिएट संघाच्या खेळाडूने सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी नावावर केली आहे. २०२२मध्ये नेदरलॅंड्सच्या बास दी लिडेनेही २२ विकेट्स घेतल्या होत्या.

या स्पर्धेत शेडलीची कामगिरी जरी उत्तम राहिली तरी यूएसएने भारत आणि पाकिस्तानविरुद्धचे सामने गमावले, तर नामिबिया आणि नेदरलॅंड्स विरुद्ध विजय मिळवला.

सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत लुंगी एनगिडी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत. यावरून शेडलीची कामगिरी किती उल्लेखनीय याचा अंदाज येतो. Shadley van Schalkwyk takes most wickets in sixth over of T20 world cup 2026

Comments are closed.