IND vs PAK: पाकिस्तानवर 61 धावांनी शानदार विजय मिळवत टीम इंडियाची सुपर-8 मध्ये एन्ट्री!

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत (Icc T20 international world cup 2026) भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना आज 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर प्रेमादासा मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.
पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी कमाल केली. अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद झाल्यावर ईशान किशनने (ishan kishan) शानदार खेळी करत 10 चौकारांसह 3 षटकार झळकवत 77 धावा केल्या. याचबरोबर तिलक वर्मा ( 25), कर्णधार सूर्यकुमार (32) तर शिवम दुबेने महत्त्वपूर्ण 27 धावांची खेळ केली. या जोरावर टीम इंडियाने 7 बाद 175 धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलाच त्रास दिला. पहिला षटकात हार्दिकने तर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानला धक्का दिला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह 2, अक्षर पटेल 2 तर वरून चक्रवर्तीने सुद्धा 2 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप, हार्दिक आणि तिलक वर्माने 1 विकेट घेतली. या विजयासह टीम इंडियाने सुपर 8 मध्ये एन्ट्री केली आहे.
Comments are closed.