टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं, नंतर गोलंदाजांनी कंबरडं मो
भारताने पाकिस्तानचा टी-20 विश्वचषक 2026 चा पराभव केला : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कोलंबोच्या ऐतिहासिक आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या विजयासह 6 गुणांची कमाई करत सुपर-8 फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या पराभवामुळे पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना आपला शेवटचा सामना ‘करो किंवा मरो’ अशा स्थितीत कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
ईशान किशनने वाजवलं पाकिस्ताचं बँड
भारताने 20 षटकांत सात गडी बाद 175 धावा केल्या. भारताकडून ईशान किशनने अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, या सामन्यात पाकिस्तानने फिरकी गोलंदाजांनी भारताविरुद्ध 18 षटके टाकली. भारताकडून ईशानने 40 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत तीन चौकारांसह 32 धावा केल्या.
7⃣7⃣ धावा
4⃣0⃣ वितरण
🔟 चौकार
3⃣ षटकारइशान किशनची अप्रतिम खेळी! 🙌 💪
अपडेट्स ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #TeamIndia | #T20WorldCup | #मेनइनब्लू pic.twitter.com/P4rtxCNkdb
— BCCI (@BCCI) 15 फेब्रुवारी 2026
भारताकडून शिवम दुबे 27 धावा करून बाद झाला, तर तिलक वर्माने 25 धावा केल्या. रिंकू सिंग चार चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह 11 धावा करून नाबाद राहिला. पाकिस्तानकडून सॅम आयुबने तीन बळी घेतले, तर सलमान आघा, शाहीन आफ्रिदी आणि उस्मान तारिकने प्रत्येकी एक बळी घेतला.
इनिंग ब्रेक!
इशान किशनचे अर्धशतक आणि मधल्या फळीचे योगदान मोलाचे आहे #TeamIndia 1️⃣7️⃣5️⃣ सह समाप्त करा
आता गोलंदाजांची वेळ!
अपडेट्स ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #T20WorldCup | #मेनइनब्लू pic.twitter.com/as8NDjIG8M
— BCCI (@BCCI) 15 फेब्रुवारी 2026
टीम इंडियाने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले
176 धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि बुमराह जोडीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अवघ्या 12 चेंडूच्या खेळात पाकिस्तानचा कर्णधार आणि टॉप ऑर्डर तंबूत परतले. हार्दिक पांड्याने डावाच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानला पहिला आणि मोठा धक्का दिला. सलामीवीर साहिबजादा फरहान याला खातेही उघडता आले नाही.
बुमराहने डावाच्या दुसऱ्या षटकात सॅम अयुबला (6 धावा) पायचीत (LBW) करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. बुमराह इथेच थांबला नाही. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला (4 धावा) आऊट केले. फक्त 13 धावांवर 3 महत्त्वाचे गडी गमावल्यामुळे पाकिस्तानचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे.
त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे पाकिस्तानचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे पाकिस्तानचा पूर्ण संघ अवघ्या 114 धावांवर गारद झाला. यामुळे भारताला हा एकतर्फी विजय मिळवता आला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.