महाशिवरात्रीनिमित्त शहरभर विविध कार्यक्रम
हिंदू धर्मातील प्रमुख उत्सवांपैकी एक असलेल्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी असलेल्या महादेवाच्या मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. उत्सवानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक पूजाअर्चांसह सामाजिक उपक्रम पार पडले.
पवईमध्ये शिवभक्तांना सरबत वाटप

भारतीय कामगार सेना लार्सन अॅण्ड टुब्रो पवई युनिटच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना मोफत सरबत वाटप करण्यात आले. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदीप (अप्पा) राऊत, उपाध्यक्ष कृष्णकांत कदम, वर्क्स कमिटीचे शाहू कदम यांच्यासह कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.
लोअर परळ ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात उत्सव

लोअर परळ येथील 90 वर्षे जुन्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्र येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख-माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, नगरसेविका पद्मजा चेंबूरकर, नगरसेवक विजय भनगे यांनी भेट दिली. यावेळी ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या प्रमुख शीतल व पुष्पा बहेन, डॉ. रवींद्र नानी उपस्थित होते.

ग्रॅण्ट रोड येथे व्ही फॉर यू सेवा फाऊंडेशन आणि जय भोले संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत साबुदाणा खिचडी आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपनेते राजकुमार बाफना, व्ही फॉर यू सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष-संस्थापक कौशिक शहा, संदेश शिरसाठ, राजेश कांगणे, किरण तावडे, विनोद आव्हाड, पंकज कांगणे, जय गुप्ता, नवनाथ गीते, सचिन भुजबळ, अशोक खटाळे, संतोष कांगणे, राजेश तिवारी, राकेश गौतम, आशीष तिवारी, जगदीश उगले, योगेश सोसे, महेश यमकर, अमोल चव्हाण, सुदाम म्हस्के, अमर परदेशी उपस्थित होते.

अंधेरी पश्चिमेकडील स्वामी समर्थ नगरातील श्री शिव गणेश मंदिरात स्वरमयी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सायंकाळी ‘स्वरसंध्या’ ही मैफल रंगली. ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद दळवी, उपाध्यक्ष अरुण सावंत यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला.
Comments are closed.