तारिक रहमान उद्या घेणार पंतप्रधानपदाची शपथ, मोदींऐवजी ओम बिर्ला राहणार उपस्थित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान हे मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याला हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हे सहभागी होतील. त्यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्राr हे देखील असतील.

रहमान हे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांची द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते ढाका येथे जाणार नाही, असे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

सार्क सदस्यांना निमंत्रण

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रहमान यांनी ठसार्कठ संघटनेला पुनरुज्जीवित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्याला ठसार्कठ देशांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यात चीनसह मलेशिया, सौदी अरब, तुर्किये इत्यादी देशांचा समावेश आहे.

Comments are closed.