पाकिस्तानी कर्णधाराची एक चूक ठरली गेमचेंजर; सूर्यकुमार यादवने विजयामागील उलगडले रहस्य, काय म्हण
भारत विरुद्ध पाक T20 विश्वचषक 2026 सूर्यकुमार यादव: आयसीसी टी-20 विश्वचषकात काल भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan T20 World Cup 2026) सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला 114 धावांत गुंडाळले. (Team India)
श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 175 धावा केल्या, परंतु पाकिस्तानला प्रत्युत्तरात फक्त 114 धावाच करता आल्या. इशान किशनने 77 धावांची (Ishan Kishan) सामना जिंकणारी खेळी केली, त्यानंतर अक्षर पटेल आणि इतर सर्व गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाची एक चूक गेमचेंजर ठरली. याबाबत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने रहस्य सांगितले आहे. (T20 World Cup 2026)
भारताच्या अष्टपैलू कामगिरीने पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला
उर्दू मधील हायलाइट्स पहा 🎥
उर्दू भाष्य आमच्यावर उपलब्ध आहे #T20WorldCup पाकिस्तान आणि वर प्रसारक https://t.co/CPDKNxpgZ3 पहिल्यांदाच 🎙️ pic.twitter.com/Ujh4PmcxUg
— ICC (@ICC) 15 फेब्रुवारी 2026
सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav Ind vs Pak T20 WC)
हा विजय देशवासियांचा आहे. आम्हाला ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळायचं होतं, त्या प्रकार आम्ही खेळलो. या विकेटवर प्रथम फलंदाजी हा सर्वोत्तम पर्याय होता. सुरुवातीला 0/1 अशी स्थिती असताना एका फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागली आणि इशान किशनने ती जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली, ते खरोखर अप्रतिम होतं, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.
सामना कसा राहिला? (India vs Pakistan T20 World Cup 2026)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात सॅम अयुब आणि सलमान आगा यांना बाद करून पाकिस्तानला धक्का दिला. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.