टीम इंडियाविरुद्ध पराभव होताच सलमान आगा संतापला; त्यांच्यावर पराभवाचं खापर फोडून झाला मोकळा, का

भारत विरुद्ध पाक T20 विश्वचषक 2026: संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 61 धावांनी (India vs Pakistan) दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धचा आपला रेकॉर्ड 8-1 असा भक्कम केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला 114 धावांत गुंडाळले. श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 175 धावा केल्या, परंतु पाकिस्तानला प्रत्युत्तरात फक्त 114 धावाच करता आल्या. (T20 World Cup 2026)

भारतविरुद्ध पराभव होताच पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान आगाने (Salman Agha) फिरकी गोलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा पराभवानंतर मान्य केले की फिरकी गोलंदाजीने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. गेल्या सहा महिन्यांत पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, परंतु आज ते कमी पडले, असं सलमान आगा म्हणाला. पहिल्या डावात फलंदाजी करणे थोडे कठीण होते. दुसऱ्या डावात खेळपट्टी चांगली होती, पण आम्ही परिस्थितीनुसार गोलंदाजी केली नाही आणि फलंदाजांनेही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, असं सलमान आगाने सांगितले. (Salman Agha On Ind vs Pak)

सामना कसा राहिला? (India vs Pakistan T20 World Cup 2026)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात सॅम अयुब आणि सलमान आगा यांना बाद करून पाकिस्तानला धक्का दिला. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.

संबंधित बातमी:

Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: भारत विश्वचषक जिंकायला…शोएब अख्तर पाकिस्तानला सुनावले, नको नको ते बोलला!

Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात…; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!

आणखी वाचा

Comments are closed.