2 संघच भारताचा पराभव करु शकतात…; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
भारत विरुद्ध पाकवर शोएब अख्तर: टी-20 विश्वचषकात काल भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan T20 World Cup 2026) सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला 114 धावांत गुंडाळले. (Team India) श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 175 धावा केल्या, परंतु पाकिस्तानला प्रत्युत्तरात फक्त 114 धावाच करता आल्या.
भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एबीपी न्यूजशी बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळला, त्याप्रमाणे पाकिस्तान सामन्यात कुठेही नव्हता. आम्हाला शाहीन शाह आफ्रिदीकडून 23 धावांची गरज नाही, आम्हाला त्याच्याकडून विकेटची गरज आहे, असं म्हणत शोएब अख्तरने शाहीन अफ्रिदीसह पाकिस्तानचा चांगलेच सुनावले. तसेच भारतीय संघाला कोणता संघ रोखू शकत असेल तर तो कदाचित इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असेल, असा दावाही शोएब अख्तरने यावेळी केला.
भारताच्या अष्टपैलू कामगिरीने पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला
उर्दू मधील हायलाइट्स पहा 🎥
उर्दू भाष्य आमच्यावर उपलब्ध आहे #T20WorldCup पाकिस्तान आणि वर प्रसारक https://t.co/CPDKNxpgZ3 पहिल्यांदाच 🎙️ pic.twitter.com/Ujh4PmcxUg
— ICC (@ICC) 15 फेब्रुवारी 2026
भारताचा सुपर 8 मध्ये प्रवेश- (Team India Super 8 WC)
टीम इंडियाने 3 सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण मिळवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला. या पराभवामुळे पाकिस्तानवर स्पर्धेबाहेर जाण्याची भीती वाढली आहे. पाकिस्तानचा पुढचा आणि शेवटचा सामना 18 फेब्रुवारीला नामबियाविरुद्ध होणार आहे. हा सामना त्यांना केवळ जिंकावाच लागणार नाही, तर इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.
3️⃣/3️⃣ साठी #TeamIndia 💙
द #मेनइनब्लू सुपर 8 साठी पात्र होण्यासाठी 6️⃣1️⃣ धावांनी जिंका! 💪
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #T20WorldCup pic.twitter.com/hFPqtYIERE
— BCCI (@BCCI) 15 फेब्रुवारी 2026
विजयानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav Ind vs Pak T20 WC 2026)
हा विजय देशवासियांचा आहे. आम्हाला ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळायचं होतं, त्या प्रकार आम्ही खेळलो. या विकेटवर प्रथम फलंदाजी हा सर्वोत्तम पर्याय होता. सुरुवातीला 0/1 अशी स्थिती असताना एका फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागली आणि इशान किशनने ती जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली, ते खरोखर अप्रतिम होतं, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.