मला या देशात राहायचे आहे! मोदींना आवडते नेते म्हणताना तापसी पन्नूचे वक्तव्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे आवडते नेते आहेत,’ असे सांगताना, ‘मला अजूनही या देशात राहायचे आहे,’ असे उद्गार अभिनेत्री तापसी पन्नू हिने काढले. तिच्या या वक्तव्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तापसीला नेमके काय म्हणायचे आहे याचे अर्थ सोशल मीडियात काढले जात आहेत.

एका वृत्तवाहिनीवर तापसी पन्नू व दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची मुलाखत घेण्यात आली. त्यातील रॅपिड फायर राऊंडमध्ये तापसी पन्नू हिला काही प्रश्न विचारण्यात आले. विविध क्षेत्रांतील आवडत्या व्यक्तींची निवड करण्याचा पर्याय तिला देण्यात आला. त्यापैकी आवडते नेते कोण या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोन पर्याय देण्यात आले. तापसी पन्नूने कोपरापासून हात जोडत नरेंद्र मोदी यांचे नाव सांगितले. मला अजूनही या देशात राहायचे आहे, असे ती म्हणाली.

सोशल मीडियात चर्चा
तापसीच्या या उत्तरावर जोरदार हास्यस्पह्ट झाला. टीव्हीच्या अँकरने ‘देशात राहायचे आहे’ या वाक्याचा अर्थ विचारला. ‘वृंदावनात राहायचे तर राधे-राधे म्हणावे लागेल’ असा याचा अर्थ घ्यायचा का, असे अँकरने विचारले. त्यावर तुम्हाला काय अर्थ काढायचा तो तुम्ही काढू शकता, पण मला या देशात राहायचे आहे, असा पुनरुच्चार तापसीने केला. तिचे हे सूचक वक्तव्य प्रचंड व्हायरल झाले आहे. यावरून सोशल मीडियात भाजप व काँग्रेस समर्थकांमध्ये दोन तट पडले आहेत. भाजप आणि मोदी विरोधकांनी तापसीचे वक्तव्य देशातील भीतीच्या वातावरणाशी जोडले आहे, तर काँग्रेस विरोधक मोदींच्या लोकप्रियतेची पावती असल्याचे सांगत आहेत.

Comments are closed.