Rohit Shetty House Firing Case – राजस्थानमधून आणखी सहा जणांना अटक
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून आणखी सहा जणांना अटक केली आहे. या सहाही जणांना मुंबईला आणले जात असून आतापर्यंत या प्रकरणात अकरा जणांना अटक झाली आहे.
रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबाराची घटना गोळीबारप्रकरणी आणखी सहा आरोपींना अटक. त्यांना राजस्थानमधून अटक करण्यात आली असून त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे : मुंबई गुन्हे शाखा
आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
— ANI (@ANI) १६ फेब्रुवारी २०२६
बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर 1 फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला होता. रात्री 12 वाजून 43 मिनिटांनी त्याच्या घराबाहेर चार राऊंड फायर करण्यात आले होते. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. या आधी पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी आणि स्वप्नील सकट आणि आसाराम फसाळे अशी त्या पाच जणांची नावे आहेत.
या पाच जणांच्या चौकशीनंतर या प्रकरणातील धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, संबंधित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Comments are closed.