T20 WC26: यूएईविरुद्ध एक विकेट घेताच राशिद खानचा वर्ल्डरेकॉर्ड, तोडणे अवघड

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या आवृत्तीत आजचा (सोमवार, १६ फेब्रुवारी) पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध यूएई यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने विश्वविक्रम केला आहे, जो तोडणे जवळपास अशक्य आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी अफगाणिस्तानच्या संघात एक बदल झालेला दिसला. फजलहक फारुकीच्या जागी जियाउर रहमानला संघात घेतले गेले.

फलंदाजीला आलेल्या युएईचा सलामीवीर आर्यंश शर्मा केवळ तीन चेंडू खेळून बाद झाला. त्याला अझमतुल्लाह ओमरझईने बाद केले. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा आर्यंश या सामन्यात शून्यावर बाद झाला. त्याने कॅनडाविरुद्ध ७४ धावा केल्या होत्या. काही वेळानंतरच मुजीब उर रहमानने यूएईचा कर्णधार-फलंदाज मोहम्मद वसीमला बाद केले. त्यामुळे २ षटकानंतर यूएईची स्थिती २ बाद १३ धावा अशी झाली.

या सामन्यातील सातवे षटक राशिदने टाकले. त्याने पहिल्या तीन षटकात अधिक धावा न देता विकेटही घेतली नव्हती. त्याने तीन षटकात १७ धावा दिल्या होत्या. यामधील १६वे षटक टाकण्यास तो आला. त्यातील तिसऱ्याच चेंडूवर त्याने मोहम्मद अफरानची विकेट मिळाली. ही हीट विकेट होती. अफरान रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात बॅट स्पम्पला लागली आणि तो बाद झाला. ही विकेट राशिदच्या टी२० कारकिर्दीतील महत्वाची आणि इतिहासातील विक्रमी विकेट ठरली.

राशिदच्या टी२० कारकिर्दीतील ही ७००वी विकेट होती. तसेच तो या प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होचा क्रमांक लागतो. त्याने ६३१ विकेट्स घेतल्या आहेत. ही आकडेवारी पाहता राशिदचा विक्रम मोडणे जवळपास अशक्य असल्याचे दिसते.

राशिदने २०२५मध्ये टी२० क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्याने ११ वर्षात ५१२ टी२० डावांमध्ये १८.५च्या सरासरीने आणि ६.५९च्या इकॉनॉमी रेटने ७०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामधील १८ डावांमध्ये ४ विकेट्स घेण्याची कामगिरी, तर ४ डावांमध्ये ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्याच्या नावावर २२ वेळा टी२० क्रिकेटमध्ये तीन विकेटस घेण्याचा इतिहास रचला आहे.

यूएईविरुद्धचा सामना अफगाणिस्तानने ५ विकेट्सने जिंकला. या सामन्यात राशिदने ४ षटकात २४ धावा देत १ विकेट घेतली.

Comments are closed.