टीम इंडियाचं मिशन सुपर-8 सज्ज! वेस्ट इंडिजसह ‘या’ दिग्गज संघांविरुद्ध रंगणार थरार; पाहा सविस्तर वेळापत्रक

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे आणि पाकिस्तानचं पुढील फेरीत जाण्याचं गणित गडबडलं आहे. टी-२० वर्ल्डकपमधील गट टप्प्यातील सामने येत्या २० फेब्रुवारीला संपणार आहेत. त्यानंतर सुपर-८चे सामने खेळवले जातील. भारताचं सुपर-८चं शेड्युल निश्चित झालं असून कधी कधी सामने खेळवले जाणार, जाणून घ्या.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व भारत हे ३ संघ सुपर-८ साठी पात्र ठरले आहेत. प्री-सीडिंगनुसार, सुपर ८ च्या ग्रुप जी १ मध्ये टीम इंडियाला एक्स १ मानलं जात आहे. आता, टीम इंडियाने एक्स १ म्हणून सुपर-८मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. पुढील फेरीतील भारतीय संघाच्या तीन सामन्यांच्या तारखा देखील निश्चित झाल्या आहेत व जवळपास प्रतिस्पर्धी संघ देखील निश्चित झाले आहेत.
वेस्ट इंडिजने तिन्ही सामने जिंकल्यानंतर क गटामधून पात्रता मिळवली आणि सुपर ८ साठी X3 स्थान विडिंज संघाचं आहे. यासह आता हे स्पष्ट झालं आहे की भारत आणि वेस्ट इंडिज सुपर-८ मध्ये भिडणार आहेत आणि त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे. तर त्यापूर्वी भारताचा सामना दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध होणार आहे. ब गटातून अद्याप कोणताच संघ सुपर-८ साठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे भारताचा सुपर-८ मधील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया की झिम्बाब्वेविरूद्ध होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
भारत वि. दक्षिण आफ्रिका – २२ फेब्रुवारी, अहमदाबाद
भारत वि. झिम्बाब्वे/ऑस्ट्रेलिया – २६ फेब्रुवारी, चेन्नईभारत वि. वेस्ट इंडिज – १ मार्च, कोलकाता
भारताचे सुपर-८ मधील तिन्ही सामने भारतात होणार असून हे सामने अनुक्रमे अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकातामध्ये होणार आहेत. तर टीम इंडियाचे सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता खेळवले जातील.
भारताचा सुपर-८ मधील दुसरा सामना कोणाविरूद्ध होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. ब गटात सुपर-८ साठीचं समीकरण सध्या फारच रोमांचक झालेलं आहे. श्रीलंका त्यांचे पहिले दोन सामने जिंकून गटात आघाडीवर आहे. दरम्यान, झिम्बाब्वेने त्यांचे दोन सामने जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियाला हरवून मोठा अपसेट केला आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी जर श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकला तर ते पुढील फेरीत जातील. श्रीलंकेने जर ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर श्रीलंका व झिम्बाब्वे हे संघ सुपर-८ साठी क्वालिफाय करतील आणि भारताचा दुसरा सामना झिम्बाब्वेविरूद्ध होऊ शकतं.
Comments are closed.