अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवणार, सूत्रांची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील विमानाचा ब्लॅक बॉक्स त्यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीला नेण्यात आला होता. पण आता हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. टीव्ही 9 मराठीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे या वृत्तात म्हटले आहे.

ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणाशी संबंधित महत्त्वाचा डेटा आणि कॉकपिटमधील संभाषण नोंदवलेले असते. त्यामुळे अपघाताच्या तपासात या उपकरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या प्रकरणावर नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत

अजित दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा जळालेल्या अवस्थेत सापडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान विमान अपघातात काहीही झालं तरी ब्लॅकबॉक्स अबाधित राहतो, याचा तपास कामात उपयोग केला जातो. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा कसा जळू शकतो? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग होत असताना शेतात कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळांमध्ये संपूर्ण विमान जळून खाक झाले. अजितदादा यांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईहून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी निघाले होते, तर बारामती येथे 8.50 वा. पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला.

Comments are closed.