उस्मान तारिकला गोलंदाजी उशिरानं दिली, पाकिस्तानचं नेमकं काय चुकलं? वकार युनूस म्हणाले…

IND वि PAK नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस यांनी पाकिस्तानच्या पराभवावर भाष्य केलं आहे. भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर 61 धावंनी विजय मिळवला. याबद्दल बोलताना वकार युनूस यांनी म्हटलं की सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 175 धावा केल्या तिथंच पाकिस्तानचा संघ मॅचबाहेर गेला होता. वकार युनूस स्टार स्पोर्टस सोबत बोलत होते. ते म्हणाले की , पाकिस्ताननं पहिल्या डावात मॅच गमावली होती. भारतानं जेव्हा 175 धावा केल्या तेव्हाच पाकिस्तानच्या हातून मॅच गेली होती, असंही त्यांनी म्हटलं.

IND vs PAK : सूर्याची उत्सुकता, पाकने सांगितले काय चुकले

वकार युनूस पुढं म्हणाले की, बॉल स्पिन होत होता सूर्यकुमार यादव यानं गोलंदाजीत समजतूदारपणा दाखवत योग्य बदल केले. पाकिस्ताननं त्यांच्या फिरकी गोलंदाजांचा योग्य प्रकारे वापर केला नाही. भारतानं फिरकी गोलंदाजांचा वापर चांगल्या प्रकारे केल्याचं देखील वकार युनूस म्हणाले. मात्र, मॅच पहिल्याच डावात संपली होती, कारण भारतानं खूप अधिक धावा केल्या होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे, पाकिस्तानची फलंदाजी चांगली नाही. भारतानं जर 175 ऐवजी 140 ते 150 धावा केल्या असत्या तर स्थिती वेगळी असती, असं वकार युनूस म्हणाले.

भारताचा सलामीवीर ईशान किशन यानं 40 बॉलमध्ये 77  धावांची खेळी केली.मधल्या फळीतील फंलदाजांनी योग्य कामगिरी केल्यानं भारतानं मोठी धावसंख्या केली. यानंतर पाकिस्तानचा संघ 18 ओव्हरमध्ये 114  धावांवर बाद झाला. वकार युनूस याबद्दल बोलताना म्हणाले की सूर्यकुमार यादवनं हार्दिक पांड्याला सुरुवातीला गोलंदाजी दिली. जसप्रीत बुमरहानं नेहमीप्रमाणं स्टम्प टार्गेट करत गोलंदाजी करत स्विंग आणि सीम करत चांगली कामगिरी केली. यानंतर पाकिस्तानसाठी स्थिती खराब झाली. सलमान अली अगानं उस्मान तारिकला लवकर गोलंदाजी न देता स्थिती आणखी अवघड केल्याचं वकार युनूस म्हणाले.

उस्मान तारिकनं चांगली कामगिरी केली, एक विकेट घेतली आणि 24 धावा दिल्या. आम्ही अनेक दिवसांपासून त्याबाबत बोलत होतो. मात्र, बराच वेळ त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. जेव्हा त्याला गोलंदाजी मिळाली तोपर्यंत ईशान किशननं त्याचं काम केलं होतं. यावेळीच पाकिस्तानच्या हातून मॅच निसटली होती.

सुनील गावस्कर यांच्याकडून सूर्याचं कौतुक

दरम्यान, भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी सूर्यकुमार यादवनं परिस्थिती पाहून खेळल्याबद्दल कौतुक केलं. सूर्यकुमार यादवनं पुढं राहून नेतृत्व केलं आहे. अमेरिकेविरोधात भारतानं जेव्हा 77  धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या, संकटाची स्थिती होती तेव्हा सूर्यकुमार यादवनं टीमला संकटातून बाहेर काढलं.पाकिस्तान विरुद्ध सूर्या फलंदाजीला आला तेव्हा 88  धावांवर भारतानं 2 विकेट गमावल्या होत्या, तिथून त्यानं 19 व्या ओव्हरपर्यंत फलंदाजी करत 32  धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं चांगल्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या नसल्या तरी एका बाजूनं तो मैदानावर उभा राहिला आणि विकेट पडू दिल्या नाहीत,असंही सुनील गावस्कर म्हणाले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.