Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर

Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर

भाजप आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करत  वनखात्याची कारभाराची कुंडली मांडली आहे. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी वनविभागाच्या कामकाजावर आणि थेट गणेश नाईक यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला आहे. वनमंत्री हे टीआरपी मिळवण्याच्या प्रयत्नात व्यग्र असल्याची टीका त्यांनी केली. वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, ग्रामीण भागातील समस्या आणि विकासकामे या मूलभूत विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गणेश नाईक यांनी मोर्चा खोलला असून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. असेच होत राहिल्यास एक दिवस तुरुंगात जावं लागेल, असा इशाराचा दिला आहे. हे सुरु असतानाच आता निलेश राणे नाईक विरुद्ध शिंदे वादात उडी घेतली आहे.

Comments are closed.