कोलंबोत पाकिस्तानला धूळ चारून टीम इंडिया मायदेशी परतली! जाणून घ्या पुढचा सामना कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार

भारतीय संघाने रविवारी (15 फेब्रुवारी) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. (IND vs PAK) या मोठ्या विजयानंतर सोमवारी (16 फेब्रुवारी) सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ भारतात परतला आहे. आता चाहत्यांना उत्सुकता आहे की भारताचा पुढचा सामना कधी आणि कोणाविरुद्ध आहे.
विशेष म्हणजे, भारतीय संघाला त्यांच्या चारपैकी तीन साखळी सामने भारतातच खेळायचे होते, फक्त पाकिस्तानविरुद्धचा एक सामना बाहेर (श्रीलंकेत) होता. पाकिस्तानविरुद्धचा हा तिसरा सामना जिंकल्यानंतर, आता टीम इंडिया आपला शेवटचा साखळी सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील ही लढत बुधवार, 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी ‘सूर्याची सेना’ कोलंबोवरून थेट अहमदाबादला पोहोचली आहे. खेळाडू आणि कोचिंग स्टाफ अहमदाबादला पोहोचल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
पाकिस्तानला हरवून भारतीय संघाने या स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. भारताचा आतापर्यंतचा प्रवास अशा प्रकारे राहिला आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा (USA) 29 धावांनी पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात नामिबियावर 93 धावांनी मोठा विजय मिळवला आणि त्यानंतर तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी नमवले.
पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे टीम इंडियाने ‘सुपर-8’ फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. ग्रुप-ए मधून सुपर-8 मध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताशिवाय वेस्ट इंडिज, इंग्लंड (ग्रुप-सी) आणि दक्षिण आफ्रिका (ग्रुप-डी) या संघांनीही सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे.
Comments are closed.