भारत-पाक सामन्यात तिलक वर्माचा धमाका! षटकारांच्या बाबतीत दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे

रविवारी (15 फेब्रुवारी 2026) कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) झालेल्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यात भारताचा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने 25 धावांची खेळी केली. 24 चेंडूंच्या या खेळीत त्याने 1 षटकार आणि 2 चौकार मारले. यासह त्याने भारत-पाकिस्तान टी-20 सामन्यांच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.

तिलक वर्माने (Tilak Verma) 2025 पासून आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 4 सामने खेळले असून 77.50 च्या सरासरीने 155 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 8 षटकार आणि 9 चौकार निघाले आहेत.

सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू (भारत-पाक टी-20):
विराट कोहली : 11 सामन्यांत 11 षटकार (492 धावा).
साहिबजादा फरहान आणि युवराज सिंग: प्रत्येकी 9 षटकार.
टिळक वर्मा : ४ सामन्यात ८ षटकार.
अभिषेक शर्मा, रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान: प्रत्येकी 7 षटकार.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 175 धावा केल्या होत्या. इशान किशनने सर्वाधिक 77 धावा (40 चेंडू) केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 25 धावांचे योगदान दिले. 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 18 षटकांत अवघ्या 114 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक 44 धावा केल्या. भारताने हा सामना दिमाखात जिंकून पाकिस्तानवर वर्चस्व राखले आहे.

Comments are closed.