पाकिस्तानची टेन्शन वाढलं! महत्त्वाच्या सामन्यापूर्वी नामीबियाच्या संघात धडाकेबाज अष्टपैलूची एन्ट्री

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये बुधवारी, 18 फेब्रुवारी रोजी नामीबिया आपला शेवटचा साखळी सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारताकडून मिळालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, पाकिस्तानला ‘सुपर-8’ मध्ये पोहोचण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अनिवार्य आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी नामीबियाने आपल्या संघात एका 20 वर्षांच्या धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूला स्थान दिले आहे. दुखापतग्रस्त बेन शिकोंगोच्या जागी एलेक्स वोल्शेंक (Alex Volschenk) याचा संघात समावेश करण्यात आला आहे. शिकोंगोला 12 फेब्रुवारी रोजी भारताच्या सामन्यादरम्यान मांडीला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

वोल्शेंक आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत.
फलंदाजीत त्याचा स्ट्राइक रेट 152.94 आहे, म्हणजेच तो खालच्या क्रमांकावर येऊन वेगाने धावा काढू शकतो. यापूर्वी तो राखीव खेळाडू म्हणून संघासोबत प्रवास करत होता.

नामीबियासाठी या स्पर्धेतील प्रवास निराशाजनक राहिला आहे. सलग तीन पराभवांमुळे (नेदरलँड्स, भारत आणि अमेरिका) नामीबिया स्पर्धेतून बाहेर पडली आहे. मात्र, शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला हरवून ते पाकिस्तानचे गणित बिघडवू शकतात.

‘ग्रुप-ए’ मधील सद्यस्थिती:

भारत: 3 पैकी 3 सामने जिंकून 6 गुणांसह ‘सुपर-8’ मध्ये पात्र.
अमेरिका: 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर (नेट रनरेट: +3.050).
पाकिस्तान: 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर (नेट रनरेट: -0.403).

जर नामीबियाने हा सामना जिंकला, तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल आणि चांगल्या नेट रनरेटमुळे अमेरिका सुपर-8 साठी पात्र ठरेल. यामुळे पाकिस्तानसाठी हा ‘करा किंवा मरा’ असा सामना असणार आहे.

Comments are closed.