ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, निसांकाचं वादळी शतक, श्रीलंका सुपर 8 मध्ये दाखल
AUS vs SL T20 विश्वचषक 2026 कोलंबो : टी 20 वर्ल्ड कप 2026 मधील सर्वात धक्कादायक निकाल लागला आहे. श्रीलंकेनं विश्वविजेत्या आस्ट्रेलियाचा पराभव करत सुपर 8 मध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेपुढं विजयासाठी 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेच्या पाथुम निसांकाच्या वादळी खेळीपुढं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा टिकाव लागला नाही. पाथुम निसांकाच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियावर 8 विकेटनं विजय मिळवला. निसांकानं 100 धावा केल्या. कुशल मेंडिसनं 51 धावा करत श्रीलंकेच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं.
SL vs AUS : श्रीलंकेचा दणदणीत विजय
2010 मध्ये महेला जयवर्धने यानं श्रीलंकेकडून टी 20 वर्ल्ड कपमध्ये शतक केलं होतं. त्यानंतर 16 वर्षानंतर पथुम निसांकानं 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावलं आहे.
ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 181 धावा केल्या होत्या. ट्रेविस हेड आणि मिशेल मार्शनं शतकी भागिदारी करुन चांगली सुरुवात करुन दिली होती. ऑस्ट्रेलियानं पहिली विकेट 104 धावांवर गमावली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना याचा फायदा घेत मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
टी 20 वर्ल्ड कपमधील 30 वी मॅच ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडली. श्रीलंकेनं टॉस जिंकून प्रथमन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं ट्रेविस हेड आणि मिशेल मार्श यांच्या फलंदाजीच्या जोरावर 8.1 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या होत्या. ट्रेविस हेड आणि मिशेल मार्श या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. श्रीलंकेच्या दुशान हेमन्था यानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या नऊ विकेट 77 धावा देत काढल्या. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट 104 धावांवर गेली होती. त्यानंतर पुढील 9 विकेट 77 धावावंमध्ये गेल्या. मिशेल मार्श आणि ट्रेविस हेड यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचे इतर फलंदाज 30 पेक्षा अधिक धावा करु शकले नाहीत. यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ 181
आस्ट्रेलिया सुपर 8 मधून बाहेर जाण्याच्या मार्गावर
ऑस्ट्रेलियाचा हा टी 20 वर्ल्ड कपमधील सलग दुसरा पराभव ठरला. झिम्बॉब्वे विरुद्ध पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी आजचा सामना महत्त्वाचा होता. मात्र, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यानं त्यांचा सुपर 8 चा प्रवास खडतर झाला आहे. झिम्बॉब्वेनं उद्या आयरलँडचा पराभव केल्यास ते सुपर 8 मध्ये प्रवेश करतील. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला शेवटचा सामना औपचारिकता म्हणून खेळावा लागेल. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचं लक्ष्य झिम्बॉब्वे विरुद्ध आयरलँड आणि झिम्बॉब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यातील लढतीकडे राहील.
दरम्यान, सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिज, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्यानंतर श्रीलंका हा संघ दाखल झाला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.