डोडा, जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलन

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरच्या दोडा जिह्यातील भदरवाह-पठाणकोट आंतरराज्य रस्त्यावर हिमस्खलनाची दुर्घटना घडली आहे. थंथेरा आणि गुलदंडा दरम्यान मार्गावर हिमस्खलन झाल्यामुळे शेकडो पर्यटकांची 40 हून अधिक वाहने अडकली होती. सोमवारी दुपारनंतर मार्गावरील हिमभाग व खडक-मातीचे ढिगारे हटवल्यानंतर एक-एक करून वाहने बाहेर काढण्यात आली. देशाच्या हिमालयीन प्रदेशात दोन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले आहेत. आजपासून दोन दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतांमध्ये पाऊस व बर्फवृष्टी अपेक्षित आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि चंदीगडमध्ये 17-18 फेब्रुवारी रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभामुळे मध्य प्रदेशात 18-19 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments are closed.