भारताविरुद्धच्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?; पाकिस्तानच्या कोचचा धक्कादायक खुलासा

भारत विरुद्ध पाक T20 विश्वचषक 2026: आयसीसी टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2026) भारताकडून 61 धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचे (Ind vs Pak T20 WC 2026) मनोबल पूर्णपणे खचले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली. श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 175 धावा केल्या, परंतु पाकिस्तानला प्रत्युत्तरात फक्त 114 धावाच करता आल्या.

भारतविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं, याचा खुलासा पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hesson) यांनी केला आहे. भारतविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सर्व खेळाडू निराश होते. भारताविरुद्धचा सामना हा केवळ पाकिस्तानसाठी सामना नाही तर प्रतिष्ठेचा विषय आहे. खेळाडूंना इतका मोठा पराभव स्वीकारणे कठीण आहे. मागील काही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करत होता आणि भारताविरुद्ध जिंकण्याचा आत्मविश्वास होता. परंतु भारतविरुद्धच्या सामन्यात संघ पूर्णपणे दबावाखाली दिसत होता, असं माईक हेसन यांनी सांगितले. (Mike Hesson On India vs Pakistan)

भारत सुपर-8 मध्ये पोहोचला, पाकिस्तानवरील दबाव वाढला- (Team India In Super 8)

पाकिस्तानविरुद्धच्या विजयासह भारताने सलग तिसरा विजय मिळवला आणि सुपर-8 मध्ये आपले स्थान निश्चित केले. दरम्यान, पाकिस्तानसमोर आता कठीण मार्ग आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला त्यांचा पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने आता पाकिस्तानवर 8-1 अशी आघाडी घेतली आहे, जी पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

भारत पाकिस्तानचा सामना कसा राहिला? (Ind vs Pak T20 World Cup 2026)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात सॅम अयुब आणि सलमान आगा यांना बाद करून पाकिस्तानला धक्का दिला. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.

संबंधित बातमी:

Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: भारत विश्वचषक जिंकायला…शोएब अख्तर पाकिस्तानला सुनावले, नको नको ते बोलला!

Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात…; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!

आणखी वाचा

Comments are closed.