Ranji Trophy 2025-26 – पडिक्कलचे द्विशतक; कर्नाटकच्या 689 धावा
देवदत्त पडिक्कलने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उत्तराखंडविरुद्ध जबरदस्त द्विशतक ठोकून कर्नाटकला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्याने झारखंडच्या गोलंदाजांची धुलाई करीत आपल्या संघाला दुसऱया दिवसअखेर 180 षटकांत 6 बाद 689 धावसंख्येपर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली.
पडिक्कलने 330 चेंडूंत 29 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 232 धावांची खेळी साकारली. हे त्याचे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठरले. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियासाठी त्याची दावेदारीही अधिक भक्कम झाली आहे. त्याला रविचंद्रन स्मरण (नाबाद 121) याची दमदार साथ लाभली. लढतीत पहिल्या दिवशी के.एल. राहुलने 141 धावांची खेळी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली होती.
उत्तराखंडची गोलंदाजी मात्र प्रभावहीन ठरली. कर्नाटकच्या फलंदाजांनी त्याच्या स्वैर मार्यावर मुक्त फटकेबाजी केली. पडिक्कलने करुण नायरसोबत (60) 129 धावांची भागीदारी रचली. पुढे स्मरण आणि कृतिक कृष्णा 60 (103 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार) यांनी पाचव्या विकेटसाठी 123 धावा जोडल्या. झारखंडकडून आदित्य रावतने 3 बळी घेतले, तरीही कर्नाटकची धावगती रोखण्यात उत्तराखंड अपयशी ठरला.
Comments are closed.