आजपासून पालिकेचे आरटीई प्रवेश, 323 शाळांमध्ये 5 हजार 936 जागा
मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आधार देणाऱ्या ‘आरटीई’ प्रवेशांतर्गत मंगळवार 17 फेब्रुवारीपासून पालिकेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. पालिकेच्या 323 शाळांमधील 5 हजार 936 जागांवर यामध्ये मुलांना प्रवेश घेता येणार आहे. यामध्ये मुलांना आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (आरटीई) अंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या 25 टक्के प्रवेशांमध्ये दुर्बल वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमधील 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये पालिका परीक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी 252 शाळांमध्ये 4 हजार 558 जागा आहेत. इतर मंडळांसाठी 71 शाळांमध्ये 1 हजार 381 जागा आहेत. अशा एकूण 323 शाळांमधे 5 हजार 939 राखीव जागा आहेत. पालकांनी अर्ज भरतांना विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी.
तसेच ज्या बालकांच्या प्रवेशासाठी यापूर्वी आरटीई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन सोडत काढण्याकरिता दिनांक निश्चित केला जाणार आहे.
10 मार्चपर्यंत अर्ज करा
‘आरटीई’ 25 टक्के ऑनलाइन प्रक्रिया अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यासाठी 17 फेब्रुवारी ते 10 मार्च या
कालावधीपर्यंत https://stunt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Comments are closed.