गुजरातमधील 30 शाळांना ईमेलद्वारे धमक्या आल्या आहेत
अहमदाबाद अन् वडोदरातील शाळांचा समावेश
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये सोमवारी सकाळी 30 हून अधिक शाळांना एका ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. या शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर पोलिसांनी संबंधित शाळा परिसरांमध्ये तपासणी केली आहे. अहमदाबाद येथील डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल, एशिया स्कूल आणि ए-वन स्कूलला धमकीचे ईमेल मिळाले होते. याचबरेबर निरमा विद्यापीठालाही अशाच प्रकारची धमकी मिळाली आहे. गुजरातला खलिस्तान करू आणि शाळेत विस्फोट होईल असे या धमकीच्या ईमेलमध्ये नमूद होते.
तर वडोदराच्या डीआर अमीन, उर्मी आणि नालंदा स्कूललाही अशाचप्रकारची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली. याचबरोबर बडौदा हायस्कूल, नवयुग स्कूल, जीवन साधना स्कूल, एडब्ल्यूएस आणि शानन स्कूलला धमकी मिळाली आहे. धमकीच्या ईमेलविषयी कळल्यावर त्वरित पोलीस आणि बॉम्बविरोधी पथकांनी तेथे धाव घेत तपासणी केली. यात काहीच संशयास्पद आढळून न आल्याने सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे.
Comments are closed.