ठाण्यात वागळे इस्टेट येथील धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला, तिघे जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी – पाचपाखाडी मतदार संघातील वागळे इस्टेट , शांती नगर येथील 30 ते 35 वर्ष जुन्या नुतन निलम या तळ अधिक पाच मजली धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळुन तिघे रहिवाशी जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी पहाटे घडली. पाचव्या मजल्यावरील स्लॅब थेट चौथ्या मजल्यावरील सदनिकेत कोसळल्याने साखर झोपेत असलेले गजेंद्र प्रसाद (60),प्रिन्स यादव (25) आणि प्रदीप यादव (23) हे तिघे जखमी झाले. सर्वाना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून यातील प्रदीप यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी ठाणे महापालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी बचाव पथकांसह दाखल झाले असून सपुर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीत 26 सदनिका आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर क्लस्टर योजनेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
Comments are closed.