चित्रपटाच्या सेटवर 15 तास वाट पाहावी लागायची! ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने सांगितला हॉलीवूडमधील खडतर प्रवास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हॉलीवूडमध्ये छोटी भूमिका मिळावी यासाठी मला एक-दोन तास नव्हे, तर 15 तास वाट पाहावी लागली होती. त्यानंतर मला हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली, असा ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने आपला खडतर प्रवास हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितला. प्रियांकाने हॉलीवूडमधील अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच ती बॉलीवूडमध्येही काम करतेय. बॉलीवूडमध्ये काम करत असताना काम मिळणे अवघड झाले होते. त्यावेळी तिने हॉलीवूडमध्ये काम करण्याचे ठरवले. हॉलीवूडमधील चित्रपटातील एका छोटय़ा भूमिकेसाठी तिला 15 तास वाट पाहावी लागली होती. ही घटना जवळपास 11 ते 12 वर्षांपूर्वीची आहे, असेही प्रियांका चोप्रा यावेळी म्हणाली.

Comments are closed.